
दै.चालु.वार्ता
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :आधुनिकतेच्या हव्यासापोटी खेड्याकडे चलाचा प्रवाह आता उलट दिशेने वाहत आहे. आपली अनिर्बंध स्वप्ने, व्यसनाधीनता याबरोबरच मोबाईल व सोशल मीडियामध्ये भरकटली जाणारी तरुण पिढी आणि अविचारी राजकारण सार कांही धोक्याच्या वळणावर येऊन ठेपले आहे. याबरोबरच आपली जीवाभावाची माणसे आज एकमेकांच्या विरोधात कशी पेटवली जात आहेत. हे सांगताना गावकी, भावकी आणि माणुसकीचे संदर्भ अलगदपणे उलगडणारी कादंबरी म्हणजे धूळधाण होय असे मत अरविंद सागर यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात अंतर्गत चालू असलेल्या व रमेश महाजन यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 316 व्या वाचक संवाद मध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक, गझल तथा गीतकार अरविंद सगर यानी गंगाधर गायकवाड लिखित धूळधाण या साहित्यकृतीवर अत्यंत प्रभावी संवाद साधताना कांही गझलांचे सुंदर आवाजात सादरीकरण केले. लेखकाच्या भावना, सामाजिक परिस्थितीत , भम्पंकपणा मिरवणाऱ्यांच्या धुक्यात पुसट होत चाललेले गावखेडे, गावाच्या विकासाचे आवाहन, विरळ होत चाललेले माणूसपण, नात्यांचे विद्रूपीकरण या सर्व बाबींचा लेखकांनी केलेले विश्लेषण अरविंद सगर यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले.
यानंतर झालेल्या चर्चेत केजकर राजनंदिनी राजेंद्र यांचेसह अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शेवटी उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी लहान बालकांनाही वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने चालू केलेला ‘मी वाचलेले पुस्तक’ या सदराखाली कुमारी शर्वरी सोमवंशी या मुलीने ती वाचलेल्या पुस्तकातील काही कथा सांगितल्या. शेवटी अध्यक्षीय समारोपात रमेश महाजन म्हणाले, की लेखक गंगाधर गायकवाड यांनी ज्या सामाजिकतेने हि कादंबरी लिहिलीय त्याच तन्मयतेने अरविंद सगर यांनी विवेचन केले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरभद्र स्वामी यानी केले,संवादकांचा परिचय हनुमंत म्हेत्रे यानी करून दिला तर आभार सावरगावे गोविंद यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा. राजपाल पाटील, मिठू पाटील, हनुमंत मेत्रे, गोविंद सावरगावे, अंतेश्वर चालवा, सुरेश वजनम आदिंनी प्रयत्न केले.