दैनिक चालू वार्ता
अहमदपूर तालुका प्रतिनिधी श्री हाणमंत जी सोमवारे
लातूर जिल्हा/अहमदपूर:-
फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक परीक्षेत अहमदपूर येथील महात्मा फुले विद्यालयाच्या १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केले असुन पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीमधून अनुक्रमे डुरे प्रसाद गणेश, पवार राज उद्धव, नवले रोहीत दत्तात्रय, पाटील तेजस्वी लक्ष्मीकांत, देमगुंडे प्रसाद वैजनाथ, मुंढे राधिका विष्णू , यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली असून इयत्ता पाचवी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुक्रमे दराडे श्रीकर महादवानंद, हगदळे विठ्ठल इरबा, जायभाये सृष्टी सचिन, केंद्रे श्रृती उमाकांत, शिंदे पुनम ज्ञानेश्वर, केंद्रे दिव्या दिनकर, जगताप सोहम सतिश या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांना श्री कज्जेवाड पी व्ही,श्री देशमुख एस एच श्री जाधव बी आर . श्री चिमाजी एस एस, श्री बुजरुग ए व्ही श्री काकडे एस एस सौ कुरळेकर एन एस सौ पत्की व्ही बी यांनी मार्गदर्शन केले.या यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांनी मिळविलेल्या उज्वल यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे अध्यक्ष श्री श्रीरंगराव पाटील, उपाध्यक्ष श्री माधवराव पाटील, सचिव श्री पांडुरंग शिंदे, कोषाध्यक्ष श्री गुंडेराव पाटील, सहसचिव श्री हिरागीर गिरी व सर्व संचालक मंडळ उदगीर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बी आर काबरा उपमुख्याध्यापक श्री ए एस सूर्यवंशी परीक्षा विभाग प्रमुख श्री माने पी एस , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.