
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी
मंठा /सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा )
राज्यातील महिलांसाठी सरकारणे नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केली असून ज्याद्वारे महिलांना प्रतीमहीना १५०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. मंठा तालुक्यातील महिलांना अर्ज करण्याकरिता खासगी मल्टीसर्विसेसचा आधार घ्यावा लागतो व अनेक वेळ रांगेत उभे रहावे लागते. ग्रामीण भागातून आलेल्या महीलांची तर अधीकच तारांबळ होते, ही बाब लक्षात घेऊन शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी मंठा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात ४ संगणक ऑपरेटर द्वारे लाडक्या बहिणींसाठी मोफत अर्ज भरण्याची सुविधा करुन दिली आहे. मंठा बस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजार समितीच्या आवारातील प्रल्हादराव बोराडे कॉम्प्लेक्स मध्ये शिवसेना संपर्क कार्यालय आहे. त्याठिकाणी महिलांसाठी पाण्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था तालुकाप्रमुख बोराडे यांनी केली आहे. शिवसेना महीला आघाडीच्या पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहून महिलांना विविध योजनांसंदर्भात माहिती त्याठिकाणी देत आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी केले.
यावेळी दिलीपराव हिवाळे, विलासराव राठोड, सतीश देशमुख, विनोद प्रधान, दत्तात्रय बोराडे, नितीन मोरे, पवन रेंगे, हलीम कुरेशी,महिला आघाडीच्या कासाबाई शिरगुळे, संगीता खराबे, सुनिता देशमुख, मीरा सरकटे, आदींची उपस्थिती होती.