
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
चालक वाहनासह पळून जातांना पोलीस कर्मचारी सुशील कुबडे व प्रवीण अमिलकंठवार यांनी पाठलाग करून पकडले व पोलीस स्टेशन ग्रामीण यांच्या ताब्यात दिले.
—————————————-——
नांदेड / उस्माननगर :-
भर वेगात गिटीची वहातूक करणा-या हायवाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना दि.३१ मार्च २०२५ रोज सोमवार ह्या
दिवशी सायंकाळी ०७ ते ०७:३० वा. च्या सुमारास नवीन कौठा येथील विशेष पोलीस उपमहानिरीक्षक कार्यलया समोर घटना घडली.या आपघातात सेवानिवृत्त पोलीस हवालदार यांच्या मुलाचा चेंदामेंदा होवून जागीच मृत्यू ची घटना घडली.यामध्ये नांदेड ग्रामीण पोलीसांनी हायवा व चालकास ताब्यात घेतले आहे.
गिट्टीचा चुरा घेऊन जात असलेला हायवा क्रमांक एम.एच.सविस – बी.ई.७९७१ हा भर वेगात जात असतांना विशेष पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालया समोरील चौकात आले आसता हायवा चालकाने त्याच्या ताब्यातील वहान निष्काळजी पनाने चालवून मोटारसायकल क्रमांक एम..एच.२६ – बी.पी.९३७३ ला दूचाकी जबर धडक दिली. ही घटना एवढी गंभीर होती की, ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आसतांना सेवानिवृत्त झालेले पोलीस हवालदार नागेशा वाघमारे यांचा मुलगा शुभम नागेश वाघमारे वय २८ वर्ष रा. कौठा, नांदेड यास जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाला आहे.
हि घटना घडली त्यावेळी उस्माननगर पोलीस स्टेशन चे पो.हे.काॅ.सुशिल कुबडे आणि जि.वी.शा .चे चालक श्री. प्रविण अमीलकंठवार हे त्यावेळी तिथे आपसात बोलत थांबले होते.
सदरची घटना घडल्याची लक्षात येताच त्यावेळी तो वाहन चालक वाहनांसह पळून जात होता. त्या दोघांनीही परीस्थितीचे गांभीर्य ओळखून हायवा गाडीचा पाठलाग करुन त्यास मामा चौकाच्या जवळून पकडून त्यास पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण च्या ताब्यात दिले असून नांदेड ग्रामीण पोलीसांनी हायवा टिप्पर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई ग्रामीण पोलीस स्टेशन करित आहे. पोलीस कर्मचारी उस्माननगर पोलीस स्टेशन चे पो.हे.काॅ.सुशिल कुबडे व जि.वी.शाचे चालक प्रविण अमीलकंठवार हे
आपले कर्तव्य बजावुन घरी जात असतांना पळून जाणाऱ्या हायवा चालकास पकडुन त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे. घरी जात असताना ही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडल्यामुळे जनमानसात पोलीसांची प्रतीमा चांगली केली आहे.
——————————————–
मयत शुभम वाघमारे हा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी नागेश वाघमारे यांचा मुलगा आहे. तो नांदेड पोलीस बाॅईज संघटनेचा जिल्हाध्यक्ष होता.
———————————————-