
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
देहूगाव :
गुजरात अहमदाबाद मध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय साऊथ वेस्ट जोन स्पर्धेत ,महाराष्ट्राच्या देहूरोड ( मामुर्डी ) येथील माई बाल भवन संस्थेच्या अंध मुलींना उपविजेते पदावरच समाधान मानावे लागले.महाराष्ट्राच्या माई बाल भवन संस्थेच्या मुलींनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून अंध मुली किती व्यवस्थित खेळांच्या नियमांचे पालन करून घेळतात याचा आदर्श इतर खेळाडूंना घालून दिला.
या स्पर्धेत गुजरात ,तामिळनाडू ,तसेच केरळसह इतर राज्यांच्या अंध मुलींच्या संघांनी भाग घेतला होता.त्यात तामिळनाडू ०: ० , केरळ ०:० , आणि गुजरात २ : ० असा सामना झाला.या पद्धतीने महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा अंतिम सामना झाला.यात गुजरात संघाने विजेतेपद पटकावले तर महाराष्ट्राच्या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्राच्या संघातील अंध मुलींनी अतिशय सुंदर खेळ करीत माई बाल भवनची दीपाली कांबळे हिने उत्कृष्ट खेळाडू , हर्षा काळभोर उत्कृष्ट गोलकीपर हा किताब पटकवला.कोमल गायकवाड , स्वाती माने ,काव्या शर्मा , या मुलींनी सहभाग घेतला होता.प्रशिक्षक विक्रम सिंग ,व्यवस्थापकाची जबाबदारी पार पडणाऱ्या शुभम काटकर , रुचिरा इंगळे , आणि गोल गाईड म्हणून मधुकर इंगळे यांचे मारदर्शन मिळाले.