
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
श्रीक्षेत्र आळंदी
गुरूवार दि. ०३ रोजी आळंदी शहराला पाणी पुरवठा होणार नसलेबाबत बाबत नगरपरिषद नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे
– कार्यकारी अभियंता भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्प पुणे महानगरपालिका यांच्या कार्यालया मधील दूरध्वनी वरून मिळालेल्या सुचनेनुसार
पुणे महानगरपालिका भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्पाच्या विविध दुरूस्तीच्या कामांकरीता गूरूवार दि. ०३/०४/२०२५ रोजी संपूर्ण आळंदी नगरपरिषदेस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. अशा आशयाचे कार्यालया कडून दूरध्वनी द्वारे सूचना प्राप्त झाले आहे.
सबब आळंदी शहरास गुरूवार दि. ०३/०४/२०२५ रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरूळीत झाल्यानंतर रोटेशन प्रमाणे पाणीपुरठा केला जाईल, तसेच पुणे महानगरपालिका मार्फत दुरुस्तीचे काम लांबल्यास पाणीपुरवठा वितरीत करणेस विलंब देखील होऊ शकतो याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे हि विनंती
अशी माहिती आळंदी नगरपरिषद यांनी दिली आहे.