
दैनिक चालु वार्ता वैजापूर तालुका प्रतिनिधी-भारत सोनवणे
वैजापूर तालुक्यातील जिरी येथील वयोवृद्ध महिला घरासमोर उभी असताना अचानक बिबट्याने हल्ला केला होता. या झटापटीत बिबट्याने या महिलेला जवळपास १०० मीटर अंतरावर फरपटत नेले, अखेरी या हल्ल्यात तिचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. झुंबरबाई माणिक मांदाळे (वय ६५) जिरी असे मृत महिलेचे नाव आहे. मानवावर बिबट्याने हल्ला केल्याची या परिसरातली ही जवळपास दहावी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी देखील याच परिसरातल्या वळण गावात घरासमोर खेळत असणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीचा देखील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, तर दोन महिन्यापूर्वी सहा वर्षाचा मुलगा आईसोबत शेतात गेला होता. त्या मुलावर देखील बिबट्याने हल्ला केल्याने तो देखील जागेवर ठार झाला होता. अनेक जनावरांवरती हल्ला केल्याने अनेक जनावरे देखील दगावली होती