
दैनिक चालु वार्ता पाटोदा (प्रतिनिधी): सुनिल तांदळे
पाटोदा (बीड): पर्यावरण संरक्षण सप्ताह उत्साहात मान्यवरांची उपस्थिती पाटोदा तालुक्यातील दासखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संन पावर प्रायव्हेट लिमिटेड दि. 25 जून रोजी फळ झाडें व फुले लागवड करून पर्यावरण संरक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी कंपनीची वतीने झाडं लागवड करण्यात आली. यावेळी प्रकल्प समन्वयक मोहन गाडे मार्गदर्शन केले. वन हक्क प्राप्त गावात शाश्वत उपजीविका आणि पर्यावरण सुरक्षा प्रकल्प राबवला जात आहे.निसर्गाचे संरक्षण आणि संगोपन करणे हे आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने किमान आयुष्यात १०० झाडे लावायला पाहिजे, परंतु आजच्या काळात हे चित्र दिसत नसून पर्यावरणाचे महत्व फार कमी दिसून येते. त्यामुळे नागरिकांकडून पर्यावरण संरक्षण आणि संगोपन व्हावे. शाश्वत असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्ती पर्यावरणाचे महत्त्व लोकांना कळावे, म्हणून संन पावर प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत शाश्वत उपजीविका आणि पर्यावरण सुरक्षा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.पर्यावरण सप्ताह वन बीज वनस्पती फुले लागवड व पर्यावरण हे आपल्या सभोवतालचे नैसर्गिक जग आहे त्यात हवा पाणी जमीन जंगल आणि सर्व सजीवांचा समावेश आहे. असे प्राणी पक्षी नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून आपल्या उपयोगिता कशा वाढवू शकतो. वन बीज बियाण्यांचे महत्त्व यावेळी नागरिकांना पटवून देण्यात आले. जसे की, बिबा हे एक औषधी असून याचा उपयोग गंभीर आजारासाठी होतो.या वेळी.उपस्थित.डॉ शरयू पडोळे. डॉ.युवराज राठोड.सय्यद कादर . महोन गाडे सन पावर प्रायव्हेट लिमिटेड . डॉ हरिदास शेलार.नितेश कुमार राख. गणेश मस्के.राहुल चव्हाण. शेख मिनाज ताई .गणेश बामदळे, लखन पवार. गणेश सरडे. अश्विनी सोनवणे, शुभम राख, तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक कोकाटे, दत्ता कोकाटे, किरण कोकाटे, बाबु पवळ हे उपस्थित होते.