
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी- अंगद कांबळे
मुंबई, विरार नालासोपारा येथुन श्रीवर्धनकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी प्राजक्ता ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच 04 एफके 6614 या
बसला घोणसे घाटातील तीव्र उतारा वरील केळेवाडीच्या वळणावर भीषण अपघात होऊन या अपघातात 3 प्रवाशी जागीच ठार तर 3 प्रवासी दवाखान्यात घेऊन जात असताना व 1 उपचारादरम्यान व ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये १५ प्रवाशी अती गंभीर आसुन त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव, अलिबाग येथे आणि महाड येथे हलविण्यात आले असल्याचे डॉ. गायकवाड यांनी माहिती दिली मागील जवळ, जवळ १५ वर्षा पुर्वी अपघातास कर्दनकाळ ठरत असलेल्या घोणसे घाटात पर्यायी मार्ग झाल्या पासुन अपघातांची संख्या व जीवितहानी थांबलेली असताना अचानक प्राजक्ता ट्रॅव्हल च्या चालकानी गाडी निष्काळजी पणाने चालवुन प्रवाशांच्या जीवितहानीस कारणीभूत ठरला आहे. माणगाव ते म्हसळा पासुन ६ किमी श्रीवर्धन अंतरावरील घोणसे घाटातील उताराचे तीव्र वळणावर सकाळी ७.४० वाजताचे दरम्यान गाडी अंदाजे ७० ते ८०फूट खोल भरधाव वेगाने कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील अश्विनी शैलेश बिरवाडकर, वय वर्षे ३५ , रा.धनगरमलई,मधुकर बिरवाडकर, वय वर्षे ६०, रा.धनगरमलई, सुशांत रिकामे वय वर्षे २८, राहणार वडघर पांगलोली या प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाला आहे तर 2४ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये १५ प्रवासी गंभीर असल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक घोणसे,देवघर येथील रहिवासी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार करण्यात आले आहे. २२ ते २५ प्रवासी क्षमता असलेल्या अपघाती बसमध्ये दोन चालकांसह ३६ प्रवाशी मुंबई उपनगरातील विरार नालासोपारा येथुन बोर्ली – श्रीवर्धनकडे प्रवास करीत असल्याचे दिसून आले.
अपघातात जखमींमध्ये वाहन चालक स्वप्नील दिलीप साळुंखे, सातारा, चालक देवेंद्र भाईप विरार, रा.विरार ,पार्थ बिरवाडकर, दिप बिरवाडकर, दिव्या बिरवाडकर, प्रतिभा बिरवाडकर, रा.धनगरमलई, सदानंद सोलकर, शैलेश सोलकर, विशाखा निमरे, विपुल निमरे रा.देवखोल, नेहा थळे, सुप्रिया रिकामे, सुधीर रिकामे, सृती खळे, श्रेया खळे, वैदही खळे, सर्व रा.नागलोली, पंकज बिरवाडकर, तुकाराम साबळे, सरस्वती साबळे, प्रतिभा बिरवाडकर, रा.धनगरमलई, अभय पाडावे, भालचंद्र पाडावे, प्रेरणा पाडावे, वैष्णवी पाडावे, विजय पाडावे, वेदांत पाडावे, विर पाडावे, तेजस बिरवाडकर सर्व रा.बोर्ली, शांताराम पवार, श्रावणी नटे, शास्वती खळे, निहाल खळे, मंदा पवार, वेदांत पाडावे सर्व रा. खुजारे हे प्रवाशी जखमी झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. अपघाताची म्हसळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आसुन अधिक तपास सुरू आहे.
अपघात होण्यापूर्वी गाडी घोणसे घाटात येताना दुसऱ्या तीव्र उतार वळणावर बस मधील एका बस चालकाने गाडीचा ताबा सोडुन दुसऱ्या बस चालकाला गाडी चालविण्यासाठी दिली होती.काही क्षणातच बस शेवटच्या तीव्र उतारावर कोसळली असे बस मधील किरकोळ जखमी प्रवासी सदानंद सोलकर- रा.देवखोल यांनी माहिती देताना सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी आणि म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भेट देवुन जखमींची विचारपूस केली. अपघातग्रस्तांना तातडीने सहकार्य करण्यात येईल व पुढील कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाचे संबंधितांना सांगितले.
घोणसे घाट पर्यायी मार्ग तीव्र उताराचा असला तरी पुर्वी सारखा अपघाती नसुन होणारे अपघात वाहन चालकाचे दुर्लक्षितपणाने किंवा गाडीत काही बिघाड झाल्यास अपघात होऊ शकतो. प्राजक्ता ट्रॅव्हल्सचा ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षात तीन ते चार अवजड वाहनांचा अपघात झाला होता मात्र जीवित हानी झाली नव्हती.बऱ्याच अवधी नंतर घोणसे घाट अपघातात एकाच वेळी तीन जण दगावण्याची घटना घडली आहे.