
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर.
पुणे: मुलीने तीच्या मैत्रीणीच्या मोबाईलवरुन वडिलांना फोन केला. मात्र ट्रू कॉलरवर पुष्पराज नाव आल्याने मुलीने बॉयफ्रेंडच्या मोबाईलवरुन फोन केल्याचा संशय वडिलांनी घेतला. यानंतर मुलीला फरशी पुसण्याच्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. मुलीला सोडविण्यास गेलेल्या घरातील सदस्यांनाही लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली.याप्रकरणी खडकी पोलिसांनी विजय बबन काची ४५ (रा.महादेववाडी, खडकी) याला अटक केली आहे.
याप्रकरणी अनिता विजय काची (४०) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अनिता यांच्या मुलीने मैत्रीणीच्या मोबाईलवरुन वडिलांना फोन केला होता.तेव्हा ट्रु कॉलरवर पुष्पराज असे नाव आले होते. त्यामुळे मुलीने कोणत्यातरी मुलाच्या फोनवरुन फोन केला असा संशय घेतला. यातूनच त्यांनी मुलीला लाकडी दांडक्याने दंडावर, पोटावर, छातीवर आणि पाठीवर बेदम मारहाण केली. तीला सोडविण्यासाठी फिर्यादी आई आली असता तीलाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत