
दैनिक चालू वार्ता नांदेड जिल्हा प्रतिनिधी- विश्वास खांडेकर
माता ही तिन्ही लोकांत श्रेष्ठ मानली जाते , परंतु बदलत्या काळानुसार वेगवेगळ्या दिवसां प्रमाणे मातृ-पितृ दिन साजरे केले जातात. त्यानुसार आज मातृदिन होय .माता म्हणजे आपत्या साठी सर्वस्व आहे खरे, या संपूर्ण जगाच्या नियंता ही माताच असते. कारण माते शिव्या या जगात पुढील कुठलीही गोष्ट विचारात आणता येत नाही माता ही आपली भगिनी मैत्रीण आधारस्तंभ स्फूर्ती आत्मविश्वास देणारी आणि मुख्य म्हणजे आपल्याला या जगात आणणारी असते. ती नसली तर हे जगच आपल्याला दिसले नसते, म्हणून देव, मनुष्य आणि राक्षसांन मध्ये देखील मातेला एक आदराचे स्थान प्राप्त आहे.
परंतु दिवसेंदिवस या दीना मुळे माता फक्त आता एका दिवसा पुरतीच मर्यादित झाली आहे की काय ?असे वाटायला लागले आहे. काही ठिकाणी तर वृद्ध माता पिता देखील वृद्धाश्रमात अगदी आपल्या अपत्यांची आठवण करीत दिवस घालताना दिसून येतात, आणि याला देखील समाजमान्यता आहे.
जर मुलगा जन्मल्याबरोबर आणि आपल्या कामाचे कारण पुढे देऊन मुलाला एखाद्या अनाथ आश्रमात सोडले किंवा हॉस्टेलवर ठेवून दिले तर तिची समाजातून प्रतारणा केली जाते, निष्ठुर आहे, वाईट आहे असे तिच्याविषयी संबोधले जाते परंतु मुलगा मोठा झाला,ज्या आईच्या कष्टावर तो मोठा झाला तिला विसरून तिला वृद्धाश्रमात नेऊन सोडतो. फक्त महिन्याचे काय पैसे तेवढे भरायचे ज्या वयात मुलाला आधाराची गरज होती त्यावेळी आईचे कर्तव्य म्हणून तिचा आधार घेणारे ही मुले म्हातारपणी तिला विचारतात?’ कर्तव्याच्या पुढे तू काय केलेस ?पालन पोषण करणे हे तुझे कर्तव्य होते .
अशा पुत्रांना आज मातृदिनी असा प्रश्न विचारावा वाटतो की आता म्हातापणी ज्या वेळेत तुमच्या आधाराची त्यांना गरज आहे त्यावेळी तुमचे कर्तव्य कुठे गेले आहे ?म्हणून अशा मातांना “दशरथाला बाबतचा पुत्रशोक होत आहे “ज्या वयात नातवाशी खेळायचं त्याच वयात मुलगा आणि नातू हे दोघेही दूर होतात. ज्या वयात मानसिक आधाराची गरज आहे त्याच वयात मानसिक दृष्ट्या प्रचंड दाबाखाली ते आता वृद्धाश्रमात दिवस काढत आहेत. अशा पुत्रांना या मातृदिनाच्या दिवशी कळकळीची विनंती तुमच्या घरात आपल्या माते साठी एक छोटीशी जागा तरी उपलब्ध करून द्यावी आणि आजच वृद्धाश्रमातील मातेला मातृदिनी घरी घेऊन जाऊन खरा मातृदिन साजरा करावा एवढीच अपेक्षा.