
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
लोहा:- येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री पी.बी.तौर यांची कल्याण जि. ठाणे येथे तर सहदिवाणी न्यायाधीश श्री पी.के.धोंडगे यांची ठाणे येथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त म्हणून बदली झाली असून त्यांना लोहा अभिवक्ता संघाच्यावतीने दि.06/05/2022 रोजी निरोप देण्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
लोहा येथील न्यायाधीश श्री तौर साहेब यांनी 5 वर्षांचा प्रदीर्घ कालावधीसाठी लोहा न्यायालयात न्यायदानाचे काम केले तर न्यायाधिश डॉ. पि. के. धोंडगे यांनी 3 वर्षे लोहा न्यायालयात न्यायदानाचे काम केले. दोघांच्याही लोहा न्यायालयातील योगदानाबददल त्यांचा अभिवक्ता संघाच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश श्री व्ही.एम.गायकवाड हे होते. न्यायदानाचे काम करीत असताना आलेल्या अनुभवांचे दाखले देत भाऊक होऊन दोघांनीही त्यांच्या सत्काराला उत्तरे दिले. न्या.व्ही. एम. गायकवाड यांच्या अध्यक्षीय समारोपाने कार्यक्रमाची सांगता झाली. तत्पूर्वी प्रास्ताविक ॲड. एस.बी. कांबळे यांनी केले. तर ॲड. गरुडकर, ॲड.मच्छेवार, ॲड. पि. यु. कुलकर्णी यांनी समयोचीत मनोगते मांडली. सूत्रसंचालन ॲड. विलास चव्हाण यांनी केले. यावेळी अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.ए. एन. मोटरवार, सचिव ॲड. विजय पवार, कोषाध्यक्ष ॲड. पि.एम.शेटे, ग्रंथालय प्रमुख पि. एस. पाटील बोरगावकर, ॲड.डांगे, ॲड. जाधव, ॲड.ताटे, ॲड.नाईकवाडे,ॲड.पाटील, ॲड. बोनागिरे, ॲड. केंद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.