
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादराव लोखंडे
आ. बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नांना यश
वाडीच्या उप जिल्हा रुग्णालयाचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भुमिपूजन सोबतच आसना नदीवरील पुलाच्या बांधकामाचाही शुभारंभ
नांदेड –वाडी, लिंबगाव, कासारखेडा, कामठा आदि पंचक्रोषीतील हजारो रुग्णांना आता विष्णुपूरीच्या शासकीय रुग्णालयाला जाण्याचा त्रास वाचविण्यासाठी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे फलित आता फळाला आले असुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मंजूर केलेल्या वाडीच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भुमिपूजन शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 10 मे रोजी सकाळी 11 वाजता वाडी येथे होणार असुन यासोबतच मालेगाव-तरोडा नाका या मार्गावर असलेल्या आसना पुलाचे बांधकामाचा शुभारंभ देखील त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
आ.बालाजी कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षापासून वाडी परिसरात अद्यावत रुग्णालय व्हावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत होती. वेगवेगळे होणारे अपघात, अचानक अस्वस्थ होणारे रुग्ण, महिलांच्या बाळंतपणाची समस्या तसेच वेगवेगळ्या दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना या परिसरात एकही रुग्णालय नव्हते. विष्णुपूरीच्या शासकीय रुग्णालयाला जाण्यासाठी जवळपास 20 ते 25 किमी चा फटका रुग्णांना बसायचा. सोबत रुग्णांना होणारा त्रास व वेदना या वेगळ्याच. या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे वाडी येथे 100 खाटांचे रुग्णालय मंजूर करण्याचा आग्रह धरला त्यांनी तसेच जिल्हाचे पालकमंत्री अशोक चव्हाण, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या मागणीला मान्यता देत, त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 65 कोटी रुपयांची तरतुद केली. त्यांत 53 कोटी रुपये रुग्णालय ईमारती तसेच वेगवेगळ्या रोगावर असलेल्या उपचार यंत्रणाची सेवा तर उर्वरित रकमेतुन डॉक्टर व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने होणार आहेत. वाडी, लिंबगाव, कासारखेडा, कामठा आदि पंचक्रोषीतील हजारो रुग्णांना त्यांचा फायदा होणार आहे. यासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून मालेगाव-तरोडा-पासदगाव-कासारखेडा-कामठा या परिसरातील गावकऱ्यांनी केलेल्या मागणी नुसार या मार्गावर असलेल्या आसना पुलाचे बांधकाम करण्याबाबत आपण पाठपुरावा केला, त्यालाहीशासनाने मंजूर दिली. या कामांचा शुभारंभ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नियोजित स्थळी होणार आहे.
विकासाच्या कामासंदर्भात जनतेचे असलेल्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपला यापुढेही प्रयत्न राहणार असुन विधानसभेत आपण लोडशेडींगच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या विज कापणीच्या विरोधात आवाज उठविला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला याचाही उल्लेख आ.बालाजी कल्याणकर यांनी केला.
वाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमास पालकमंत्री अशोकराव चव्हाण, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, उच्च् व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, खा. हेमंत पाटील, आ. अमरनाथ राजुरकर, आ.मोहनराव हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, युवासेना विस्तारक ॲड अमित गीते, मा.आ. अनुसयाताई खेडकर, मा.आ. नागेश पाटील आष्टीकर, मा.आ. रोहिदास चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्षा ठाकुर, आयुक्त सुनिल लहाने, शिवसेना जिल्हाप्रमुख, दत्ता पा. कोकाटे, उमेश मुंडे, आनंदराव पा.बोंढारकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिराव भोसीकर, मुख्य अभियंता, ब.सी.पांढरे, अधिक्षक अभियंता, अविनाश धोंडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, धोंडू पाटील, मनोजराज भण्डारी, भुजंग पाटील, प्रकाश मारावार, दयाल गिरी, अशोक उमरेकर, सचिन किसवे, तुलजेस यादव, निखिल लातूरकर, माधव पावडे, बाळासाहेब देशमुख, जयवंत कदम, गजानन कदम, व्यंकटेश मामीलवाडी, सरपंच अश्विनी लोखंडे, साधना माधव पावडे, बाळासाहेब पावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सर्वांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना आ. बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर) यांनी केले आहे.