
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पटना : बिहारच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका बाजूला लालू प्रसाद यादवांचं राष्ट्रीय जनता दलाने भाजपा आणि केंद्र सरकारच्या विरोधात युद्धच छेडलं. तर दुसऱ्या बाजूला भाजपासोबत युती करून सरकार चालवणारे नीतिश कुमार यांनी आपल्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
यामुळे आता बिहारच्या सत्ताकारणात बदल होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुढचे ७२ तास बिहारच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्या आमदारांशी सातत्याने चर्चा करत आहेत. भाजपासोबत युती करून सत्तेवर असतानाही त्यांनी पुढचे ७२ तास आपल्या सर्व नेते, आमदारांना पटनामधून बाहेर पडण्यास मनाई केली आहे.