
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि- कवी सरकार इंगळी
प्रसिद्ध कादंबरीकार दि. बा. पाटील यांच्या हस्ते बाल साहित्य सेवा पुरस्कार मा लेखक श्रीकांत पाटील याना देणेत आला. व्यासपीठावर डॉ. सुभाष कदम, अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजीराव शिंदे, सभेचे माजी अध्यक्ष डॉ. मा. ग. गुरव, कार्यवाह मिलिंद कोपार्डेकर…………
मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा २०२० सालचा साहित्यसेवा पुरस्कार डॉ. श्रीकांत पाटील यांना ज्येष्ठ कादंबरीकार दि. बा. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बालकुमार सभेचे अध्यक्ष चंद्रकांत निकाडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सल्लागार डॉ. मा. ग. गुरव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सभेच्या २९ वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला. बालकुमार साहित्य सभेमार्फत राबविले जाणारे उपक्रम, स्पर्धा यांची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय रवींद्र खैरे यांनी करून दिला.
प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते डॉ. श्रीकांत पाटील यांना साहित्य सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांना २०१९ सालचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन २०१९ व सन २०२० या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे प्रस्तावित असलेल्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने विश्वास सुतार, वीरा राठोड, रमेश तांबे, किरण भावसार, डॉ. सुनिताराजे पवार, डॉ. सुरेश सावंत, देवबा पाटील, सौ. वर्षा चौगुले, संजय ऐलवाड, प्रा. रामदास केदार, वीरभद्र मीरेवाड, डॉ. नंदकुमार डंबाळे आदी मान्यवरांना उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. सुभाष कदम यांच्या हस्ते मराठी बालकुमार साहित्य सभेच्या ई अंकाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मनावर सुसंस्कार करण्याचे महत्त्वाचे कार्य बालसाहित्यातून होत आहे. बालसाहित्याने मनोरंजनाबरोबर विद्यार्थ्यांचे प्रबोधनही केलं पाहिजे असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक दि. बा. पाटील यांनी व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी बालसाहित्य लिहिणे ही खूप अवघड गोष्ट असल्याचे नमूद करून विजेत्यांचे अभिनंदन केले. ज्ञान, माहिती, तपशील आणि संस्कार करण्याची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. विजेत्यांच्यावतीने विश्वास सुतार व किरण भावसार तसेच श्रीमती दीप्ती कुलकर्णी, डॉ. श्रीकांत पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. बालकुमार साहित्य सभेचे कार्यवाह मिलिंद कोपार्डेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शाम कुरळे, परशराम आंबी, पी. एस. पाटीलसर, रवींद्र महापुरे, रवींद्र आपटे, संभाजी चौगले, सौ नसीम जमादार, सौ. स्नेहा वाबळे, सौ कमल कुरळे उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. संयोगिता महाजन यांनी केले.