
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी- निरज तांडेल
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मान्यतेनं व महाराष्ट्र हॉकी औंध, पुणे यांच्या वतीनं नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे सुरू करण्यात आलेल्या ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्रा’चं उद्घाटन आज करण्यात आलं. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधून प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली. शहरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे खेळाडू निर्माण करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.