
दैनिक चालू वार्ता भूम तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:-झाड आहे तर हवा आहे . हवा संपली की जीवन संपलं . स्वच्छ हवेशीर निरोगी जीवन जगण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे . प्रत्येकाने आयुष्यात किमान एक तरी झाडाचे संगोपन करावे असे आवाहन भूम तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी बी व्ही सदानंदे यांनी जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करताना केले .
रविवार दिनांक ५ जून २०२२ रोजी भूम तालुक्यात शासकीय . निमशासकीय कार्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला . या निमित्ताने भूम तालुका वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पुढाकाराने उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर . पंचायत समिती कार्यालय परिसर . शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात जवळपास ६५०० वृक्ष लागवड करण्याचा शुभारंभ करण्यात आला .
वृक्ष लागवडी दरम्यान वड . चिंच . पिंपळ . उंबर . जांभूळ . पेरू . आंबा . विलायती चिंच . आवळा . हिरडाभेडा अशा विविध प्रकारच्या रोपाचे वृक्षारोपण केले जाणार आहे .
भूम येथील उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करताना उपविभागीय अधिकारी श्रीमती रोहिणी न-हे तर पंचायत समिती परिसर व आयटीआयच्या परिसरात वृक्षारोपण करताना गटविकास अधिकारी बी आर ढवळशंक . जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंगरीकर . अमेय पाटील . पत्रकार शंकर खामकर . भूम तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी बी व्ही सदानंदे . वनीकरण कर्मचारी के बी आडे यांचेसह शिक्षक . निदेशक कर्मचारी . शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .