
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
वादळी पावसाने शेतातील फळपिकांचे व उसाचे पंचनामे करून मदत जाहीर करावी शेतकऱ्यांची मागणी.
बावडा ते नीरा नरसिंहपूर परिसरात बुधवार दिनांक 8 रोजी सायंकाळी मृग नक्षत्राच्या सुरवातीलाच मेघगर्जना सहित विजांचा कडकडाट आवाज होऊन पावसाने जोरदार हाजेरी लावली.आचानक झालेल्या पावसामुळे शेतातील केळी, आंबा, पेरू, लिंबू, डाळिंब, ऊस, मका, कडवळ, या सारखी शेतातील पिके जमीन दोस्त झाल्याने शेतकरी राज्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे.
एकीकडे कर्जाचा डोंगर तर दुसऱ्या बाजूने निसर्गाकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे.
वादळी वाऱ्यामुळे काही लोकांची पत्र्याची लोखंडी शेड तर नारळा सारखे फळांचे वृक्ष विजेचे खांब, जमीनीवर कोसळलेले आहेत.
नुकसान झालेल्या पिकांची टक्केवारी न पहाता राज्य शासनाने ताबडतोब याकडे लक्ष देऊन सर्वच शेतकऱ्यांचे पंचनामे करून भरपाई मिळावी आसी गरीब शेतकऱ्यांची मागणी आहे.
नरसिंहपुर, गिरवी, आडोबावस्ती,ओझरे, गोंदी पिंपरी बुद्रुक, टणु, गणेशवाडी, बावडा, सराटी, वकिलवसती, लुमेवाडी,सुरवड,लिंबुडी, या सर्व भागाला पावसाने झोडपले.