
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा कोविड योद्धा म्हणून सर्वत्र परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते युनूस पठाण यांनी गरिबीत हालाखीचे दिवस काढत असलेले व आर्थिक परिस्थितीशी सामना करत असलेले प्रभाग क्र.(३४) धनगर बाबा मंदिर थेरगांव मधील रहिवासी बाळू खरात यांना सामाजिक दायित्व म्हणून आर्थिक मदत केली आहे. आता जुन महिना सुरू झाला आहे.या महिन्यात पाऊसाला सुरुवात होते.त्यामुळे पाऊसाळ्यात घर गळण्याची जास्त प्रमाण असते त्यात बाळु खरात यांचे कोरोनामध्ये काम गेले. त्यामुळे बाळु खरात यांची आर्थिक परिस्थिती बिघडली. हताचे काम गेल्याने बाळु खरात यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.अशातच पाऊसही पडण्याचे दिवस देखील जवळ आले आहेत.पाऊस जर पडला तर घराची पडझड होऊ नये.घरावरची पत्रे उडून जाऊ नये. हि भावना अंगीकृत स्विकारून सामाजिक कार्यकर्ते युनूस पठाण यांनी हे काम केल्याचे सांगितले.दरम्यान जिवन जगत असतांना समाजाचे काहितरी देणं असतं म्हणून हि आर्थिक मदत केल्याची भावना दैनिक चालु वार्ता शी बोलताना कोविड योद्धा युनूस पठाण यांनी सांगितले, या सामाजिक भावनेने कोविड योद्धा युनूस पठाण यांनी केलेल्या कार्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.