
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पिंपरी:क्रांतिभूमी महाड येथील चवदार तळे व गांधार पाले बुद्ध लेणी येथे एक दिवशीय कार्येशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कोलबुद्ध या लेणी कार्येशाळेत महाराष्ट्रातील ८ ते ९ जिल्ह्यातील बौद्ध बंधू आणि भगिनींनी पहिल्यांदाच या बुद्ध लेण्यांना भेट दिली. हि कार्येशाळा आयोजित करण्यामागचे कारण म्हणजे आपण आपल्या प्राचीन वारसा असलेल्या बुद्ध लेण्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने इतर संधीसाधू लोक या बुद्ध लेण्यांमध्ये अतिक्रमणे करत आहेत आणि चुकीचा इतिहास आलेल्या पर्यटकांना सांगत आहेत व आपणही आपला अभ्यास नसल्यामुळे त्यांनी जे सांगितले आहे त्यालाच खरे मानत आहोत त्या मुळे अशा कार्यशाळा आयोजित करणं हे लेणी संवर्धन समितीचा मुख्य उद्देश आहे. या कार्येशाळेत जे पूर्वी कोणत्याही बुद्ध उपासक लेण्यांमध्ये कधी गेले नाहीत अशांची निवड आयोजकांनी केली होती व अभ्यास दौऱ्यामध्ये काही उपासकांनी सर्वांची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली होती. अशाच प्रकारचे मोफत अभ्यास दौरे महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून आपण लवकरच काढणार आहोत अशी माहिती बुद्ध लेणी संवर्धन समितीने दिली आहे. या अभ्यास दौऱ्याचे प्रमुख मार्गदर्शक
सागर कांबळे बोधिसत्व यूट्यूब चैनल
व कार्यक्रमाचे अध्यक्ष महायान मसुरे
शिलालेख वाचन संतोष वाघमारे
आनंद खरात समाधान सोनवणे व मी मनोज गजभार
अनिल जाधव अशोका वारियर्स यांनी या अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या सर्वांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
गांधार पाले बुद्ध लेणी तील खाली पडलेल्या बुद्ध स्तूपांचे संवर्धन संवर्धन आपण सर्व लेणी संवर्धक संघटनांना सोबत घेऊन करणार आहोत व कोल बुद्ध लेणी येथील माती देखील आपण सर्व लेणी संवर्धक संघटना व लेणी संवर्धक यांना सोबत घेऊन बुद्ध लेणी स्वच्छता मोहीम राबवणार आहोत.असा मनोदय व्यक्त केला.
या बुद्ध लेणी अभ्यास दौऱ्याच्या शेवटी सुजाताताई नवघरे यांनी प्राचीन वारसा असलेल्या बुद्ध लेण्यांचे संवर्धन आणि संरक्षण कशा प्रकारे करावे या विषयी सुंदर मार्गदर्शन केले. शेवटी चंद्रकांत बोचकुरे व मनोज गजभार यांनी सर्वांचे आभार मानले.