
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
नाशिक जिल्ह्यांतील चांदवड तालुक्यातील कळमदरे गावचे शहीद जवान अर्जुन तुकाराम गांगुर्डे यांना कर्तव्य बजावत असताना हृदयविकारांच्या झटक्याने वीरमरण आले. त्यांना वीरमरण आलेची माहिती चांदवड तालुक्यांतील कळमदरे गावासह पंचकोशीवर शोककळा पसरली. त्यांच्यावर शनिवारी सायंकाळी शासकीय इतमामांत अखेरची मानवंदना देवुन शहीद जवान अर्जुन गांगुर्डे यांना अखेरचा निरोप देण्यांत आला. शहीद जवान अर्जून गांगुर्डे हे ओडिशा राज्यांतील राऊकेला येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते . कळमदरे येथील शेतकरी कुटुंबात अर्जुन गांगुर्डे यांचा जन्म झाला लहानपणापासून अर्जुन, देशसेवा करण्याची आवड होती त्यानुसार त्यांनी १९९१ मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती झाले. तेव्हापासून ते आजपर्यंत अर्जुन गांगुर्डे यांनी आपले कर्तव्य बजाविले होते तसेच ते सध्या कुटुंबासह नाशिक येथे वास्तव्यांस होते ते ओडिशा येथील राऊकेला येथील आपले कर्तव्य बजावत होते. गुरुवारी सायंकाळी कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकारांच्या तीव्र झटक्यांने त्यांचे निधन झाले. शनिवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी कळमदरे गावात पोचले प्रथम पार्थिव त्यांच्या घरासमोर ठेवण्यांत आले. यावेळी त्यांच्या पत्नीस आई-वडिलांनी एकच आक्रोंश केला. यावेळी उपस्थितांना अश्रूं अनावर झाले त्यानंतर त्यांची सजवलेल्या ट्रॉलीतुन कळमदरे गावातून भारत माता की जय , अमर रहे अमर रहे अर्जुन गांगुर्डे, अमर रहे अशा घोषणा देत उपस्थिंत ग्रामस्थ व मित्रपरिवार अंतयात्रेत सहभागी झाले. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामांत लष्करी जवानांकडूंन हवेत गोळीबार करुन अखेरची मानवंदना देत त्यांना अखेरचा निरोप देण्यांत आला. जवान अर्जुन गांगुर्डे यांच्या पश्चांत आई , वडील ,पत्नी मुलगा, मुलगी असा त्यांचा परिवार होता. शहीद जवान अर्जुन गांगुर्डे यांचा रोहन गांगुर्डे या मुलाची काही दिवसांपूर्वीच नुकतीच सैन्यदलांच्या लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली होती. यावेळी केंद्रीय मंत्री भारती ताई पवार , चांदवड देवळाचे आमदार राहुल दादा आहेर, चांदवड तालुक्यांचे तहसिलदार प्रदीपजी पाटील , कळमदरे गावचे सरपंच सौ. निलम ताई नंदकुमार जाधव, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर कळमदरचे पोलीस पाटील अशोक गांगुर्डे यांच्यासह सैन्य दलांतील जवान यांच्यासह सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी कळमदरे गावचे पोलीस पाटील अशोक गांगुर्डे यांच्याशी दूरध्वनीच्या माध्यमांतून संपर्क साधून शहीद जवान अर्जुन गांगुर्डे यांना शोक संदेश व्यक्त करीत त्यांच्याकडूंन शहीद जवान अर्जुन गांगुर्डे यांच्या विषयी माहिती घेतली. तसेच यावेळी अन्य मान्यवर मंडळींनी शहीद जवान अर्जुन गांगुर्डे यांच्या पार्थिवांचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली