
दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधीः -माणिक सुर्यवंशी.
देगलूर(दि.१५) सद्याची परिस्थिती पाहता संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने थैमान घातले असून सामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे सामान्य जिवन विस्कळीत झाले असताना देगलूर तालुक्यातील तुपशेळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दि.१४ जुलै २०२२ गुरुवार रोजी शाळेला अतिवृष्टीमुळे सुट्टी देण्यात आली होती,परंतू त्याचा फायदा घेऊन अज्ञातांनी शाळेची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करून शाळेच्या परिसरात पत्ते खेळत दारू पिऊन दारूच्या बाटल्या फोडून शाळेच्या परिसरात फेकण्यात आले व गुटखा खाऊन भिंतीवर थुकने तसेच इतर साहित्यांची थुकुन रांगोळी काढण्यात आली .
यामध्ये शाळेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे .एकीकडे शाळेची गुणवत्ता व भौतिक सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न होत असताना,शाळेचा स्तर उंचावण्यासाठी शाळेतील शिक्षकांकडून होणाऱ्या प्रामाणिक प्रयत्नांना हरताळ फासण्याचे काम काही समाजकंटक करत आहेत.
तरी त्यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सर्व ग्रामस्थांनी केली आहे.