
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
श्रावण महिन्यात दर सोमवारी व शनिवारी खुलताबाद, वेरूळला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर खुलताबादकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
{ २९ जुलै ते २९ ऑगस्टपर्यंत दर शुक्रवारी सायंकाळी ६ ते शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत नगर नाका- दौलताबाद टी पाॅइंट- घाट हा रस्ता मध्यम व जड वाहनांसाठी बंद असेल. त्यादरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करावा. { दौलताबाद टी पाॅइंट ते माळीवाडा -फतियाबाद, जांभाळा गाव, कसाबखेडा, वेरूळमार्गे पुढे { दौलताबाद टी पॉइंट ते माळीवाडा- नवीन सोलापूर-धुळे महामार्गावर पुढे. { धुळे-नाशिककडे जाणारी वाहने नगर नाका मार्गे एएस क्लब- नवीन सोलापूर-धुळे महामार्ग तसेच साजापूर –करोडी –शरणापूर फाटा – दौलताबाद टी पॉइंट -माळीवाडामार्गे पुढे जातील.
{ औरंगाबादकडून कन्नड, धुळेकडे जाणारी सर्व जड वाहने दौलताबाद टी पॉइंट माळीवाडा-कसाबखेडा फाटामार्गे वेरूळ, कन्नडकडे जातील. { कन्नडकडून येणारी सर्व जड वाहने वेरूळ – कसाबखेडा फाटा -माळीवाडा मार्गे औरंगाबादकडे येतील. { फुलंब्रीमार्गे खुलताबाद, कन्नडकडे जाणारी सर्व जड वाहने औरंगाबाद-कसाबखेडा फाटा-वेरूळमार्गे कन्नडकडे जातील. { वेरूळ, खुलताबादकडून फुलंब्रीकडे जाणारी वाहने वेरुळ-कसाबखेडा फाटा-माळीवाडामार्गे औरंगाबादकडे जातील.