
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम:-बंधन सामाजिक संस्थेच्या वतीने तालुक्यातील विधवा घटस्फोटीत निराधार अशा गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे .
या महिलांना आर्थिक रोजगार निर्माण उपलब्ध व्हावा , आर्थिक टंचाई भासू नये , विधवा घटस्फोटीत निराधार महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी या महिलांचे प्रबोधन करून त्यांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी काँग्रेस कमिटी भूम तालुका उपाध्यक्ष प्रभाकर डोंबाळे , हाडोंग्री गावचे सरपंच सुधीर क्षीरसागर , पत्रकार रोहित चंदनशिवे , उद्योजक अशोक जगदाळे , बंधन संस्थेचे व्यवस्थापक सोमनाथ मेत्रे , प्रदीप कदम , एरिया मॅनेजर योगेंद्र कुमार , टीम लीडर अमृत दास व लाभार्थी महिला उपस्थित होत्या.