
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका जिंकला. आता उभय संघात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत देखील संघाने ०-१ अशी आघाडी मिळवली आहे
शुक्रवारी (२९ जुलै) खेळला गेलेला पहिला टी-२० सामना भारताने ६८ धावांनी जिंकला. भारतीय संघाने या सामन्यात चांगले प्रदर्शन केले, पण वरच्या फळीतील श्रेयस अय्यरला एकही धाव करता आले नाही. आता याच पाश्वभूमीवर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत नाराज आहेत.
माजी दिग्गज कृष्णमाचारी श्रीकांत यांच्या मते श्रेयस अय्यर ऐवजी दीपक हुड्डा याला प्लेइंग इलेव्हमध्ये सहभागी केले पाहिजे होते. भारताचा माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा सोबत बोलताना श्रीकांत म्हणाले की, “हुड्डा कुठे आहे? तो टी-२० सोबतच एकदिवसीय क्रिकेटमधील चांगला खेळाडू आहे. तो असा खेळाडू आहे, जो तिथे (संघात) पाहिजे होता. टी-२० क्रिकेटमध्ये तुम्ही हे समजून घेण्याची गरज आहे की, तुम्हाला अष्टपैलू हवे असतात. फलंदाजी किंवा गोलंदाजी असो, जास्तीत जास्त अष्टपैलू संघात असावेत. हेच तुमच्यासाठी योग्य आहे.”
पुढे बोलताना ओझा म्हणतो की, “राहुल (द्रविड) भाईला असे वाटते की, जर एखादा खेळाडू तुमच्यासाठी खेळल असेल, तर त्याला समर्धन दिले पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या पर्यायाकडे गेले पाहिजे.” तितक्यात श्रीकांत ओझाला थांबवतात आणि म्हणातात की, “राहुल द्रविडचे विचार आम्हाला नको आहेत. जे हवे आहे, ते लगेच पाहिजे, असा तुमचा विचार हवा पाहिजे.”
दरम्यान, शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्याचा विचार केला, तर भारतीय संघाने अप्रतिम प्रदर्शन केले. नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. पण वेस्ट इंडीजने घेतलेला हा निर्णय भारतीय फलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. सालामीसाठी आलेल्या कर्णधार रोहित शर्माने ४४ चेंडूत सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचे प्रदर्शन देखील उल्लेखनीय राहिले. कार्तिकने अवघे १९ चेंडू खेळून २१६ च्या स्ट्राईक रेटने ४१ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. खेळाडूंच्या या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर भारताने ६ विकेट्सच्या नुकसानावर १९० धावा केल्या. प्रत्युत्तार वेस्ट इंडीज संघ ८ विकेट्सच्या नुकसानावर १२२ धावा करू शकला. आता मालिकेतील दुसरा सामना १ ऑगस्ट रोजी खेळला जाईल.