
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे अग्रणी, मानवतावादी साहित्याचे सम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजाचे युवा नेतृत्व शिवराज दाढेल यांच्या नेतृत्वाखाली लोहा शहरात विविध ठिकाणी अभिवादन सभा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१आगस्ट २०२२ रोजी लोहा शहरातील गोरोबा काका मंदीर नवी आबादी,सिद्धार्थ नगर, इंदिरा नगर, जायकवाडी सह शहरातील विविध भागात अभिवादन सभेचे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शिवराज दाढेल यांनी दिली.
जुना लोहा शहरातील गोरोबा काका मंदीर, नवी आबादी येथे १ आगस्ट रोजी सकाळी १२.३० वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रोहिदास चव्हाण माजी आमदार लोहा-कंधार,तर अध्यक्ष म्हणून गजानन सावकार सुर्यवंशी लोकनियुक्त नगराध्यक्ष न.पा.लोहा, प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ दादा पवार सुर्योदय मन्याड फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, बाळासाहेब पाटील कर्हाळे उपजिल्हाप्रमुख शिवसेना, प्रमुख उपस्थिती करिम भाई शेख गटनेते तथा नगरसेवक न.पा., प्रमुख वक्ते प्रा.डॉ.संजय बालाघाटे राष्ट्रीय अध्यक्ष रा.भ.वि.महासंघ, प्रमुख उपस्थिती प्रा.राजेश ढवळे उद्योजक नांदेड यांसह लोहा न.पा.चे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, नगरसेवक केशवराव मुकदम,शरद पाटील पवार, छत्रपती धुतमल,बबन निर्मले,संजय पाटील कराळे माजी शिक्षण सभापती, शिवाभाऊ नरंगले वंचित जिल्हाध्यक्ष, नवनाथ (बापू) चव्हाण जिल्हा नियोजन समिती सदस्य, शेषेराव कहाळेकर सामाजिक कार्यकर्ते, हरिभाऊ चव्हाण शिक्षक नेते,यांसह सर्व नगरसेवक, विविध संघटनांचे,पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.