
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी -श्री, रमेश राठोड
;::;;:::::::::::::::::::::’:::::::::::::::::::::::::
सावळी सदोबा:–आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील मौजा साखरातांडा येथील शांताबाई सूर्यभान चव्हाण या विधवा महिला शेतकऱ्यांनी सततच्या नापिकीला व कर्जाला कंटाळून विष प्रशासन करून आपली जीवन यात्रा संपवली,शांतीबाई सूर्यभान चव्हाण यांची मौजा साखरा तांडा येथे स्वतःच्या मालकीची शेत सर्वे नंबर १७०/३ शेत जमीन असून, त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँक सावळी सदोबा शाखेची थकीत कर्ज असून,मागील काही दिवसापासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणे तन वाढल्याने, यावर्षी सुद्धा आपल्या शेतात नापिकी होणार,शेतीसाठी घेतलेले कर्ज यावर्षी सुद्धा फिटणार नाही,मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकाचे नुस्कान झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी,कुटुंबाचा कमवता पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंबाची जवाबदारी या विधवा महिलावर येऊन होती, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचं हा विचार त्यांना नेहमीच सतावत होता,विचाराने आत्महत्या त्यांच्या मागे एक सून व दोन नात आहे परिवाराचा गाडा कसा चालवावा या कारणामुळे निराश्य होऊन आत्महत्या केल्याची घटना साखरा तांडा गावामध्ये झाली विधीवा महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडून सर्व परी न्याय शेती शिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे विधवा महिलेचा धीर खचला आणि पुढच्या संसाराचा गाडा कसा चालवायचा असे विचार करून आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून आत्महत्या करण्यात आली असल्याची चर्चा सावळी परिसरामध्ये चालू आहे,