
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर
बारामती : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा बारामतीमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. एका क्रीडा संकुलाच्या वूडन फ्लोअरींगच्या उद्घाटनाला अजित पवार यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी अजित पवारांच्या हस्ते जी पूजा करायची होती, ती पूजा करण्याचा त्यांनी मान एका तरुणीला दिला. तेथे हजर असलेल्या सामान्य खेळाडू तरुणीलाच उद्देशून अजित पवारांनी क्रीडा संकुलातील पूजा करण्यास सांगितलं. अजित पवारांनी सगळ्यांसमोर तरुणीला पूजा करण्याचे आदेश देताच, ही तरुणीही थोडीशी चक्रावून गेली. पण अजित पवारांनी या तरुणीला पूजा करण्याबाबत सांगताना, पूजा कर ना, मी सांगतोय ना, असं म्हटलं आणि उपस्थितांनाही चकीत केलं. यावेळी संपूर्ण क्रीडा संकुलाची पाहणीही अजित पवारांनी यांनी घेतली. दरम्यान, याआधीही एकदा अजित पवारांनी महिलांना बरोबरीची वागणूक आणि संधी मिळावी, यासाठी पावलं उचलल्याचं दिसून आलं होते. डिसेंबर महिन्यात सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी दादांच्या गाडीचं सारथ्य हे एका महिला पोलीस कर्मचारीने केलं होतं.