दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरांच्या इतिहासात सामाजिक, राजकिय, संस्कृतिक व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मोठे रसिक दिलदार दिलखुलास व्यक्तिमत्त्व असणारे कै. रामभाऊ चन्नावार यांची आज दि. २ सप्टेंबर रोजी दित्तीय पुण्यतिथी असून त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.
कै. रामभाऊ चन्नावार यांचा जन्म १मे १९५१ रोजी वलांडी ता. उदगिर,जि.लातूर येथे झाला.
त्यांचें कुटुंबीय १९६०-७० च्या दशकात वलांडी येऊन लोहा येथे उदरनिर्वाह करण्यासाठी दाखल झाले व्यापार उद्योग व्यवसाय करु लागले. त्यावेळी लोहा येथे कापसाचे मार्केट फार जोरात होते सात -आठ जिंनिग फॅक्टऱ्या होत्या . रामभाऊ चन्नावार यांनी त्याकाळात एक ट्रक घेतली, त्यानंतर मेडिकल स्टोअर्स काढले ती जळाल्याने नंतर किराणा दुकान टाकले. त्यानंतर त्यांनी विमा क्षेत्रात प्रवेश केला.
१९८७-८८ च्या मध्ये त्यांनी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीची पहिल्यांदा निवडणूक लढवून रथी – महारथी चा दारूण पराभव केला व ते लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तरुण तडफदार संचालक झाले त्यांनी बाजार समिती मध्ये उत्कृष्ट कार्य केले.
त्यानंतर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांशी प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व ते शेवटपर्यंत शिवसेनेतच राहिले त्यांनी शिवसेनेत अनेक पदे भोगली शिवसेनेचे ते नांदेड जिल्हा उपाध्यक्ष होते त्यानंतर १९९३ च्या लोहा न.पा.च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेनेचे तात्कालीन जिल्हा प्रमुख रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोंढा वार्डातून ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले व त्यांनी गर्भ श्रीमंत उमेदवारांचा पराभव केला. तसेच त्यांनी शिवसेनेचे तात्कालीन जिल्हा प्रमुख रोहिदास चव्हाण यांच्या सोबत अनेक वर्ष काम केले १९९५ ला राज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची राज्यात लाट आली व शिवसेनेचे तात्कालीन जिल्हा प्रमुख रोहिदास चव्हाण हे कंधार मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले व आमदार झाले व राज्यात शिवसेना-भाजप युती ची सता आली व त्यावेळी शिवसेनेचे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले.
त्यावेळी राज्यात कापुस एकाधिकार होता राज्यात अनेक जिनिग फॅक्टऱ्या होत्या कापसाचा व्यापार फार मोठा होता त्यावेळी शिवसेनेची राज्यात सत्ता होती तात्कालीन आ. रोहिदास चव्हाण यांच्या शिफारशीनुसार रामभाऊ चन्नावार हे कापुस पणन महासंघाचे महाराष्ट्राचे प्रशासक झाले त्यावेळी त्यांनी लोहा शहर व तालुक्यातील तरुणांना वाॅचमन च्या नौकऱ्या लावल्या.
तसेच लोहा शहरात गणेश उत्सवाची मोठी स्पर्धा असायची लोहा शहरांत त्यांनी त्यावेळी अनेक नाटके, ऑर्केस्ट्रा आणली.
नागरिकांना खूश केले.
तसेच ते पुढे चालून ते काही वर्षांनी लोहा न.पा. ते दुसऱ्यांना निवडून आले व ते लोहा न.पा.चे उपनगराध्यक्ष झाले.
तसेच त्यांनी विमा क्षेत्रांत ही उल्लेखनीय कार्य केले करोडो रूपयांच्या पालीशी उतरून ते महाराष्ट्रात मुंबई वगळता प्रथम पुरस्कार मिळविला त्यांनी एक वर्षाचा अनेक गोरगरीब हमाल ,मापाडी, शेतकरी यांचा विमा उतरविला याचा फायदा त्यांच्या कुटुंबीयांना झाला .
तसेच लोहा शहरातील आताचे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नामांकित सुर्या मशनिरीचे दुकानांचे मालक शिवाजी होळगे यांची पूर्वी लोहयात मोटार भरायची, इलेक्ट्रॉनिक्स ची दुकान जळाली होती त्यामुळे शिवाजी होळगे हे आर्थिक अडचणीत सापडले होते मानसिक तणावाखाली असल्याने ते आत्महत्या करायला निघाले होते तेव्हा त्यांना रामभाऊ चन्नावार यांनी धीर देऊन त्यांना जळालेल्या दुकानाचा विमा मंजूर करून दिला व त्यामुळे त्यांचे पुनर्वसन झाले व ते आता लो यातील एक आघाडीचे व्यापारी आहेत.
रामभाऊ चन्नावार यांनी राजकारण व पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांनी अनेक मित्र जोपासले ते एक अजात शत्रू होते.
त्यांच्या मित्रांपैकी मी ही एक मित्र आहे. तसेच माजी आमदार रोहिदास चव्हाण, माणिकराव मुकादम, लक्ष्मण संगेवार, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, दिनेश सावकार तेललवार, केशवराव मुकदम, मुक्तेश्वर धोंडगे , खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, शेषराव कहाळेकर , अशोक संगेवार, धनंजय पवार, दत्ता वाले , कै. गोपाळ सावकार कोटलवार आदी मोठे मित्रमंडळ त्यांचे होते .
ते सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात सदा अग्रेसर होते ते लोहा तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष होते त्यांनी अनेक गोरगरीब वयोवृद्ध महिला पुरुष अपंग विधवा यांना निराधार योजनेचे अनुदान मंजूर करून दिले.
तसेच ते रसिक होते कलाकार होते त्यांना लावणी महोत्सव पाहण्याचा छंद होता त्यांनी लोहयात पहिल्यांदा नटरंगी नार उडवी लावणीचा बार हा सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणीची मेजवानी लोहा वासियांना दिली .
ते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत शिवसेनेतच राहिले शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्यांना नावानिशी ओळखत असत.
अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला २०२० मध्ये कोरोना महामारीने घेरले व २ सप्टेंबर २०२० रोजी त्यांचे हैद्राबाद येथे उपचारा दरम्यान निधन झाले आज त्यांच्या निधनाला दोन वर्ष पुर्ण झालेत तरी ते व त्यांचा सहवास मार्गदर्शन आज ही आठवते ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
रामभाऊ चन्नावार यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन
