
दैनिक चालु वार्ता पुणे जिल्हा उपसंपादक -शाम पुणेकर.
पुणे : आपल्या लाडक्या बाप्पाच्या महाउत्सवात काेटींची उलाढाल झाली नाही तरच नवल. काेराेनाच्या दाेन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदाचा उत्सव निर्बंधमुक्त साजरा हाेत असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात
किमान हजार कोटींची उलाढाल होईल, असे जाणकार सांगत आहेत. यात मूर्ती ते मांडव आणि पूजा ते विसर्जन मिरवणूक अशा १० दिवसांच्या खर्चाचा समावेश आहे.
राज्य सरकारने घेतलेला निर्बंधमुक्त उत्सवाचा निर्णय आणि आगामी महापालिकेची निवडणूक विचारात घेऊन ‘होऊ द्या खर्च’ म्हणत इच्छुकांनी घेतलेली उत्सवातील उडी यामुळे बाजारपेठेत नवचैतन्य संचारले आहे. सार्वजनिक मंडळांपासून ते घरगुती गणेशस्थापना करणाऱ्यांपर्यंत प्रत्येक जण यंदाचा उत्सव जल्लाेषात साजरा करण्यासाठी सरसावला आहे.
– उत्सव सार्वजनिकपणे साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या आहे ३,५६६ आणि
घरगुती गणेश प्रतिष्ठापना होणाऱ्या कुटुंबाची संख्या- ४,५४,६८६ आहे.
ही दुहेरी शक्ती प्रत्यक्ष कामी येवून उत्साहात आणि जल्लोषात पुण्याचा गणेशोत्सव साजरा होत असतो. म्हणूनच पुण्याचा हा गणेशोत्सव देशातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या पाठीवर प्रसिद्ध आहे. याचा प्रत्येक पुणेकराला सार्थ अभिमान आहे.
लोक वर्गणी, जाहिरातदार, मोठमोठे स्पाॅन्सरर्स, होर्डिग्ज आणि मोठमोठ्या कमानी इत्यादी विविध स्तोतच्या माध्यमातून पुण्यातील दहा दिवसांच्या उत्सवासाठी जवळपास एक हजार कोटीच्या वर रूपये जमतात आणि त्याच्या अंदाजे ८० टक्के पैसा हा गणेशोत्सवासाठी खर्च होत असतो.
खर्चामध्ये मंडप उभारणी, मूर्ती,
विद्युत रोशनाई, वादन साहित्य खर्च, दहा दिवस सकाळ संध्याकाळची आरती, मोठमोठया सेलिब्रेटींचे मानधन, विसर्जन मिरवणूक खर्च, कार्यकर्त्यांचा चहा नाष्टा जेवणाचा खर्च आणि इतर असंख्य गोष्टींसाठी होणारा खर्च या जमलेल्या एक हजार कोटींमधून भागविला जातो. असा असतो पुणे गणेशोत्सवाचा रुबाब आणि थाटमाट.