
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : जिंतूर तालुक्यातील शेकडो मच्छीमार बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी यलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन पुकारले आहे. शासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून समस्त मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करावा अशी त्यांची मागणी आहे.
यलदरी येथील स्व. राजीव गांधी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेने बामणी-चारठाणा, जिंतूर पोलीस ठाण्यात मत्स्य. व्यावसायिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी त्यांची मागणी आहे.
या जलसमाधी आंदोलनात शेकडो महिला, पुरुष व लहान लहान बच्चे कंपनींनी सुध्दा सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या मागण्यात त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, संस्थेच्या बोगस पदाधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. मच्छिमारांच्या परवान्यांचे आणि कमिशनच्या पैशांची सखोल चौकशी केली जावी शिवाय बामणी-चारठाणा, जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुध्दा गुन्हे दाखल केले जावेत, अशा प्रकारच्या विविध मागण्या जलसमाधी आंदोलनात सहभागी मत्स्यव्यवसाय बांधवांनी लावून धरल्या आहेत.
गौरी-गणपती सणाचे औचित्य साधून कोलपा परिसरात पुकारले गेलेले हे जलसमाधी आंदोलन सर्वदूर चर्चेचा विषय तर ठरले गेले आहेच शिवाय शासन-प्रशासनाचेही लक्ष वेधून घेत आहे एवढे मात्र नक्की.