
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
माजी राज्यमंत्री आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भूम:- तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यासह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केल्याबद्दल माजी नगरसेवक विरोधी पक्ष नेते रोहन जाधव यांचा माजी राज्यमंत्री आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टी या पक्षाला भूम तालुक्यात बळ वाढताना दिसत आहे. पक्षांमध्ये सध्या इन्कमिंग चालू आहे. त्यामुळे तालुक्यात भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे या पक्षाला उभारी मिळणार आहे. काही दिवसापर्वीच माजी नगरसेवक रोहन जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यामुळे पुढील राजकीय करकीर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी भाजपा चे जिल्हा अध्यक्ष नितीन काळे,माजी नगरसेवक युवराज नळे,जेष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर, तालुकाध्यक्ष महादेव वडेकर,सरचिटणीस संतोष सुपेकर,पं.स.सदस्य वनवे सर,बाबा वीर,बिभीषण टाळके ,चंद्रकांत गवळी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.