
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- येथील मयूर शाळू यांची भूम व वाशी तालुक्यासाठी होमगार्ड तालुका प्रभारी समादेशक अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषक शाखा उस्मानाबाद चे पोलीस निरीक्षक मा रामेश्वर खनाळ साहेब व वाशी पोलीस निरीक्षक मा. चिंतले साहेब,भूम पोलीस स्टेशन येथे गृहरक्षक दलाचे जवान संभाजी चौधरी,औदुंबर जाधव,वजीर साप वाले ,किरण शेळके, नानासाहेब वीर ,अमोल जाधव, फाटक धनंजय ,भोसले राहुल, सोनटक्के कैलास, गायकवाड नागजी, अनिल कवडे,गृहरक्षक दलाचे जवान यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.