
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे : गणेशोत्सवाची मिरवणूक यंदा विसर्जन वेळेसोबतच एका वेगळ्या चर्चेनेही रंगली. ही चर्चा होती, बारामतीत राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी भाजपाने सुरू केलेल्या “मिशन बारामती २०२४’ ची. गणेश विसर्जनाच्या काही दिवस आधीच या मोहिमेची सुरुवात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यानंतर त्याचा राजकीय प्रत्यय विसर्जनाच्या दिवशी आला. पुण्यात मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी आलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपवर खोचक टीका केली.’ सरकारने कुठल्याच पालकमंत्र्यांची अजूनही नेमणूक केली नाही. त्यामुळे माझ्यासह विविध पक्षातील विरोधी नेत्यांना मंडळाचे कार्यकर्ते प्रेमाने बोलवितात.’
भाजपच्या मिशन बारामती मोहिमेचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खोचक शब्दांत समाचार घेतला. “आम्हाला काही फरक पडत नाही. गेल्या ५५ वर्षांत आम्ही बारामतीत इतके काम करून ठेवले आहे की आमच्या पुढे कोणी टिकून शकत नाही. किती जण आले अन् गेले. अशा खूप लाटा मी पाहिलेल्या आहेत. तर बारामतीकरांना खूप चांगलं माहिती आहे, की कुणाचं बटन कसे दाबायचे ते. ते या निवडणुकीतही आपले काम बजावतील” असेही पवार यांनी स्पष्ट केले.
बारामतीकर विचार करूनच मतदान करतात. त्यामुळे तिथं विचारांचा विजय होतो,’ असे सांगत आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडत बारामतीत पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच खासदार होईल हे स्पष्ट केले.