
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- जागतिक हवामान बदलाचा परिणामामुळे आपणांस यापुढे अतिवृष्टी व दुष्काळ याला सामोरे जावे लागणार आहे. यात सर्व प्रथम शेतकरी होरपळेल यात काही दुमत नाही. म्हणून पर्यावरण संवर्धनाकरता शेतकरी लोकानीच पुढाकार घ्यावा लागणार आहे. प्रा. परमेश्वर पौळ व धर्मराज पौळ यांचे वडील कै. श्री. विश्वनाथराव (आबा) हरिबापू पौळ यांनी वयाच्या सत्तरी पर्यंत शेतात काबाढ कष्ट केले. शेवटीच्या काळापर्यंत त्यानी निसर्गावर व मुक्या जणावरावर त्यांचा फार जीव लावला होतो. त्यांनी जिवनात जवढ शक्य आहे तेवढी झाडे लावली व जगवली आहेत. आपल्या वडीलाचे आवडीचे काम पुढे चालू ठेवून अभिवादन करण्याचा संकल्प त्यांच्या मुलानी केला. त्यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त पौळ कुटुंब व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने अल्लमप्रभू देवस्थान व सार्वजनिक स्मशानभूमी या पवित्र स्थळी वृक्षारोपण व स्वच्छतेतून अभिवादन सामाजिक कार्यकर्ता तथा कृषिभूषण मा. श्री. कांतराव देशमुख झरीकर, वृक्षमित्र फाउंडेशनचे मा.श्री. संतोष मुगटकर, मा.श्री सतीश कुलकर्णी , हेरीटेज राणीसावरगावचे मा.श्री.देवानंद कदमुळे, मा.श्री. संदीप कुलकर्णी ,सामाजिक वनीकरण विभाग’ नांदेडचे वनपाल मा.श्री.अंबादास बेदरकर, मा.श्री. वन्यजीव नांदेड विभागाचे वॉर्डन अतिंद्र कट्टी, जांभुळबेट संवर्धन समितीचे मा.श्री.मा.संदिप देऊळगावकर, मा.श्री.मा.गोविंद दुधाटे, श्री.मा. राम कदम, खंडाळी गावचे सरपंच मा. अशोकराव मोरे,उपसरपंच मा.गिरीधररावजी पौळ, तलाठी मा.प्रल्हाद पल्ले ,ग्रामविकास अधिकारी मा. अशोक लामदाडे पाटील, मा.अरविंदजी जगताप आदीमान्यवराच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गावकर्यांनी वृक्षारोपणाबरोबरच परीसर स्वच्छता केली. या प्रंसगी कांतराव देशमुख झरीकर बोलतांना म्हणालेकी कै. विश्वनाथराव (आबा) पौळ यांच जीवनांतील काम समाजासाठी प्रेरणादायक आहे. पौळ परीवार व गावकरी मंडळीने वर्षश्राद्ध विधी बरोबरच पर्यावरण संवर्धनाचे समाजकल्याणकारी काम हातात घेतल्या बद्दल सर्वाचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजक प्रा. परमेश्वर पौळ यांनी असे मत व्यक्त केल की आपण सर्वांनीच धार्मीक विधीकरण्याबरोबरच स्मशानभूमी , तीर्थक्षेत्र, शाळा, कार्यालय , व शेती, या पवित्र प्रदेशात वृक्षारोपण स्वच्छता मोहीम राबवली पाहीजे. भारतीय संस्कृती ही पर्यावरणाचे संवर्धन करा हीच शिकवण दैनंदिन जीवनातून देत आणि उद्याचा धोका लक्षात घेता तर आपण पर्यावरण संवर्धन करणारी माणसे प्रत्येक गावागावात व प्रत्येक कुटूंबात तयार केली पाहीजेत. हा नावीन्यपूर्ण उपक्रमात लावलेली झाडे आम्ही निश्चितच जोपासू असा निर्धार गावकर्याच्या वतीने सरपंच,उपसरपंच व प्रशासकीय आधिकाऱ्यांनी केला. या कार्यक्रमासाठी मा.बंडेराव भिसे, मा. भाऊसाहेब जाधव, मा.पंचू शिंदे , मा.रवी जाधव, मा.वसंतरावजी पौळ, मा. दत्ता पौळ , मा. धर्मराज पौळ, , मा. मोतिराम पौळ, मा.बाबुराव पौळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या नावीन्यपूर्ण पर्यावरण संवर्धनाच्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महात्मा फुले महाविद्यालयाचे विद्यार्थी , परमविश्व फाउंडेशनचे अभियंता सोमेश शिंदे ,अभियंता योगेश पौळ, अजय पौळ, अवधूत पौळ, सौ. संगिता भिसे, सौ.जानका जाधव, सौ.चिमणाबाई शिंदे, सौ. वर्षा पौळ, बाळासाहेब पौळ, माधव पौऴ, शिवाजी पौळ, राम पौळ, दयानंद खोमणे , गुरु जाधव आदीने परिश्रम घेतले.