
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“”””””””””””””””””””””””””””””””'””””””””””””
परभणी : जिल्हापरिषद आयोजित उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळा परभणी येथील भाग्यलक्ष्मी लॉन्स येथे शुक्रवार, दि. ९ सप्टेंबर २२ रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व मार्गदर्शक शिवानंद टाकसाळे हे होते.
या प्रसंगी अन्य जे महानुभव, मान्यवर आवर्जून उपस्थित होते, त्यात मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर येथील सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, परभणी ॲस्टॉनामिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, सामान्य प्रशासन विभागाचे उपकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, मुख्य वित्त व लेखाधिकारी सचिन कवठे, प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव, हवामान अभ्यासक पंजाब डख, कृषीभूषण कांतीलाल देशमुख झरीकर, माजी सभापती दादासाहेब टेंक्षे, माजी सभापती अनिल नखाते, प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्यासह सर्व उप शिक्षणाधिकारी, तालुका गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, सर्व शिक्षकांची उल्लेखनीय अशीच उपस्थिती होती.
यावेळी असंख्य गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांना ज्ञानार्जन करणाऱ्या अनेक शिक्षकांचा व आदर्शवादी शाळांचा पुरस्कार प्रदान करुन यथोचित मान-सन्मान व गौरव करण्यात आला.
शालेय कालावधीत जिल्हाभरातील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ओत प्रोत ओतून ज्ञानार्जन करीत असतात. विविधांगी शिक्षणाबरोबरच बौध्दिक कलेचा आणि विकासाचा स्त्रोत कशाप्रकारे वाढीस लावत असतात, हे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांतून स्पष्ट होत असते. मग त्यात काव्य असो, किंवा निंबंध, प्रबंध; विविध खेळ असो वा बौध्दिक विकासाला चालना देणारे अन्य कोणतेही प्रयोग-प्रयोजन; पाठांतर असो वा लेखी सुंदर, वळणदार आणि सुवाच्च्य असे हस्ताक्षर असो; वाचन असो वा संभाषण किंवा भाषण या मधून होणारा वाक्प्रचार आणि शुध्द वाक्यरचना; शिस्त व निट नेटकेपणा, बुध्दीमत्ता व कुशलता हा सुध्दा एक कसब असतो. या आणि अशा अनेक पैलूंवर आधारित शिक्षणाचं व कला गुणांचं परिमार्जन उपस्थित मान्यवर करीत असतात. यातूनच आत्मसात करणारे विद्यार्थी आणि ज्ञानार्जन करणारे समस्त गुरुजन यांच्या बौध्दिक कलेचं परिमार्जन होत असतं. किंबहुना त्याचंच कौतुक म्हणून हा सोहळा आयोजित केला जातो. मग विद्यार्थी असोत वा शिक्षक, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली जाणे क्रमप्राप्तच असते. त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते योग्य असा पुरस्कार देऊन यथोचित मान-सन्मान व गौरव होणे अत्यंत गरजेचे असते. त्यांनी केलेल्या परिश्रमाचे ते भरीव असे यशच असते. जिल्हा परिषदेचे (सीईओ) मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळणारे सन्माननीय शिवानंद टाकसाळे यांनी एक निष्ठावंत व कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांनी भव्यदिव्य अशा सोहळ्याच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. ही बाब अत्यंत गौरवशाली अशीच म्हणावी लागेल.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रवीण वायकोश यांनी व प्रास्ताविक विठ्ठल भुसारे यांनी केले तर उपशिक्षणाधिकारी शौकत अली यांनी आभार व्यक्त केले.