
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
जि. सातारा दहिवडी पोलीस ठाण्यांचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आपला पदभार स्वीकारतात दोन नंबर वाल्यांच्या विरोधांत धमाकेदार कारवाईचा बगाडा चांगलाच उगरला असून धमाकेदार कारवाई करीत आपले मनसुबे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दहिवडी परिसरांसह दोन नंबरचा व्यवसाय करणाऱ्यांचे धांबे चांगलेच दणाणले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यांसमवेत मार्डी ता.माण येथे शेतात छापा मारुन सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. श्री. सोनवणे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील मार्डी ता. माण येथील काळेवस्ती मधील इसम नामे. राहुल तुकाराम गायकवाड हा त्याच्या शेतामध्ये ऊस मका, घासगवत लावून त्याच्यामध्येच गांजाचे पीक घेत असल्याबाबत आणि विक्री करीत असल्यांची गोपनीय माहिती दहिवडी पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे दहिवडी पोलिसांनी वेशांतर करून गुडघ्यावर चिखलात घुसून सदर शेतात छापा टाकला सदर छाप्यांत दहिवडी पोलिसांनी पोलीस ठाण्यांच्या इतिहासामधील आजपर्यंतची गांजा विरोधात सर्वात मोठी कारवाई केली. यामध्ये इसम राहुल तुकाराम गायकवाड (वय२३) याच्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली आहे. सदर कारवाई मध्ये सुमारे ०९ लाख ०९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यांत दहिवडी पोलिसांना यश मिळाले. त्यांच्या या कारवाईबद्दल जिल्हा प्रशासनाकडूंन व परिसरांतून चांगलेच कौतुक होत आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक ओ.के. निर्मळ,पो. कॉ. संजय केंगले प्रकाश हांगे नीलम रासकर,पो. कॉ.चंदनशिवे,पो.ना बनसोडे, पी.पी कदम तसेच होमगार्ड कोकरे माने खरात यांच्यासह आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.