
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर
दलित पॅंथर चे ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांनी नांदेड येथे कुसुमताई चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या भारतीय दलित पॅंथर या संघटनेचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ पॅंथरचा गौरव सोहळा नांदेड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील लोकप्रिय शाहीर गौतम भाऊ पवार, वंदना पवार यांच्या गीत गायनाने सभागृहातील सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. आणि हा कार्यक्रम एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने सादरीकरण करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाचे उद्घघाटन पॅंथर नेते आदरणीय अविनाशजी महातेकर साहेब यांच्या हस्ते व माजी आमदार जयदेवजी गायकवाड पुणे व ज्येष्ठ पत्रकार मोगले साहेब आणि सुरेश दादा गायकवाड नांदेड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.यावेळी माझे वडील आदरणीय भाऊसाहेब वाघंबर यांचा पॅंथर सेनापती म्हणून गौरव सन्मान करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा.मंत्री पॅथर आदरणीय अविनाशजी महातेकर साहेब, माजी आमदार जयदेवजी गायकवाड साहेब व महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार मोगले साहेब,व सुरेश दादा गायकवाड नांदेड यांच्या हस्ते माझा सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि मेडल देऊन व पुष्पगुच्छ देऊन माझा गौरव सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे व सभागृहात उपस्थित असलेल्या जनसमुदाय या सर्वांच्या समोर हा देखणा सोहळा अविस्मरणीय असा नांदेड येथे पार पडला