
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कंधार तालुका युवा अध्यक्ष तथा घोडज येथील शालेय शिक्षण समिती चे अध्यक्ष तथा जय स्वाभिमानी कुंभार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य कंधार तालुका अध्यक्ष , ग्रामीण भागातील उद्योजक तेलंगे व्यंकटी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडज येथे फळे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक शेख मॅडम,सुनील घोडजकर, ज्ञानेश्वर टोकलवाड, रुपेश कांबळे ,रेशमाजी टोकलवाड व शाळेतील इतर शिक्षक वर्ग व विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.