
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर हे नाम फाउंडेशन च्या माध्यमातून शहीद जवान व शेतकरी यांच्या साठी बरीच मदत करतात त्यांनी करत असलेल्या या कार्याबद्दल वीर सैनिक ग्रुप चैरिटेबल ट्रस्ट च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व नांदेड जिल्ह्यात वीर सैनिक ग्रुप व इतर आजी – माजी सैनिक ज्या पद्धतीने समाजकार्य करत आहेत त्या विषयी जवळपास 30 मिनिटे सुप्रसिद्ध अभिनेते तसेच नाम फाउंडेशन चे अध्यक्ष मा .श्री मकरंद अनासपुरे यांनी वीर सैनिक ग्रुप चैरिटेबल ट्रस्ट सोबत चर्चा केली व पुढे चालून नक्कीच वीर सैनिक ग्रुप ला नक्कीच सहकार्य करू असे सरांनी सांगितले व वीर सैनिक ग्रुप चे कार्य पहाता अत्यंत खुश झाले सैनिक असून देश सेवे सोबत समाज सेवा करता हा खूपच स्तुतिजनक उपक्रम आहे असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी वीर सैनिक ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सैनिक प्रविण देवडे , जिल्हाध्यक्ष गजानन गव्हाणे ,वीर सैनिक ग्रुप चे मार्गदर्शक व सैनिक फेडरेशन जिल्हा उपाध्यक्ष कॅप्टन विठ्ठल कदम साहेब, सैनिक विष्णू जाधव , माजी सैनिक रमेश कपाळे, सैनिक गजानन गोनेवाड , जयेश भरणे , अर्जुन नागेश्वर , निखिल मुदिराज , प्रांजली , सायली गोरे , सत्यव्रत सुरावार, साई कदम , सागर ढालकरी, प्रदीप टाक आणि सर्व वीर सैनिक ग्रुप ची टीम उपस्थित होती .