
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- कंधार तालुक्यातील पेठवडज सर्कल मधील 22 गावे ही मुखेड विधानसभा मतदारसंघात जोडलेली असून त्यामुळे कंधार तालुक्यातील
सदर गावाची विकास कामे होत नसल्यामुळे कंधार तालुक्यातील सर्व गावे कंधार विधानसभा मतदारसंघांमध्ये सामाविष्ट करणे याबाबत जिल्हाधिकारी साहेब व मा.निवडणूक आयुक्त साहेब निवडणूक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई मंत्रालय मुंबई येथे विनंती अर्ज देले होते पण त्याचा कुठलाच विचार केला गेला नाही.तरी मुखेड तालुक्याच्या हादीबाहेरील जोडलेली 22 गावाकडे कसलाच निधी देत नाहीत.गाव विकास कामे केली जात नाहीत अशाप्रकारे आपल्या देशातील हजारो खेडे गावातील जनतेवर अशी वाईट वेळ आलेली आहे.माय भाकर देईना आणि बाप भीक मागू देईना अशाप्रकारे या जनतेची न्याय मागण्यासाठी जावे कुणाकडे आपले दुःख सांगावे कुणाला वारस मुलाप्रमाणे त्याच्यावर अशी वेळ आलेली आहे.तरी मा.प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई व मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी ही मागणी लवकरात लवकर पुर्ण करुन सहकार्य करण्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी जाधव, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कंधारे व तेटवाड गणपत माधवराव यांनी दिले आहे.