
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी- माधव गोटमवाड
१५ ऑक्टोबर हा ‘भारतरत्न’ डॉ,ए .पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच या दिवशी जागतिक हात धुवा दिन सुद्धा जगात सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, म्हणूनच
मानवी जीवनामध्ये वाचन संस्कृतीला व स्वच्छतेला अतिशय महत्त्व आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.विठ्ठल बरसमवाड यांनी महात्मा गांधी विद्यालयात बोलताना केले
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य खांडवी यू .एल यांनी डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. लेखिका अर्चना डावखर मॅडमनी आजच्या विद्यार्थ्यांनी काय वाचावे, याविषयी मार्गदर्शन केले.
सर्व विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सर्वच विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन करून डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन केले.
तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शिला शिंदे यांनी मराठी भाषेतून.सिंकदर शेख सरांनी हिंदी भाषेतून तर श्रीमती श्रध्दा मुखेकर मॅडमनी इंग्रजी भाषेतून पुस्तकाचे वाचन केले. यावेळी कार्यक्रमात कु. राणी जायभाये,
कु.सारूक पूजा, बडे धनंजय,
फुंदे श्रावण ,कराड शुभम् ,पाखरे वैष्णवी,या विद्यार्थ्यांनी डॉ.अब्दुल कलामच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले .यावेळी मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अर्जुन गायकवाड सरांनी तर आभार आदिनाथ शिंदोरे सरांनी मानले.