
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
संपूर्ण राज्याचे व देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या बिनविरोध निवड झाल्याने लोहयात शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) प्रणित युवा सेनेच्या वतीने लोहयात मध्यवर्ती बसस्थानकाजवळ फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी पं.स. सदस्य नवनाथ (बापू) रोहिदास चव्हाण, शिवसेना लोहा शहर प्रमुख महेश चव्हाण,अशोक केंद्रे, व्यंकटेश वाघमारे, राहुल ससाणे, सतीश सुर्यवंशी,शिव काकडे, पंकज चव्हाण, दिपक चव्हाण, निलेश चव्हाण, वीरभद्र वसमतकर,शेषीकांत शिंदे, गोविंद, शिंदे, आदी उपस्थित होते.
यावेळी प्रतिक्रिया देताना पं.स. सदस्य नवनाथ ( बापू) चव्हाण म्हणाले की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत पराभवाच्या भितीने भाजपा व शिंदे गटांनी या निवडणुकीत माघार घेतली.
या पोटनिवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या प्रचंड मतांनी विजयी होणार होत्या त्यामुळे भाजपा व शिंदे युती गटाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे कारण उद्या चालुन मुंबई महापालिकेच्या निवडणूका आहेत यांचा इफेक्ट तिथे मोठ्या प्रमाणात दिसून येईल म्हणून भाजपा व शिंदे गट युतीने यातून माघार घेतली आहे.
तसेच लोहा -कंधार मधुन कुणी शिंदे गटात प्रवेश केला तर त्यांचा तिळमात्र परिणाम होणार नाही.तसेच युवा सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त लोहा तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात येतील असे नवनाथ ( बापू) चव्हाण म्हणाले.