
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:आज मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र् प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधींनी मुंबई येथे कांग्रेस पक्षाच्या मुख्यलयात टिळक भवन दादर येथे मतदान केले…. यावेळी मतदार म्हणून
माजी मंत्री डी.पी.सावंत साहेब,आ.अमरनाथ राजूरकर साहेब,मा.आ.वसंतराव पाटील चव्हाण,मा.मारोतराव पाटील कवळे गुरुजी,मा.आ.हणमंतराव बेटमोगरेकर,मा.अनिलजी मोरे,श्रीनीवासजी मोरे,आ.जितेश अंतापुरकर,मा.आ.ओमप्रकाश पोकर्णा,अविनाश घाटे,यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते…