
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नगरच्या संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ येथे बर्डे कुटुंबातील चार चिमुकल्यांना शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. आज बर्डे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, सहसंवेदना व्यक्त केल्या. या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा होईल, तशा पद्धतीची कायदेशीर कारवाई सरकारनं करावी. कुटुंब सदस्य परत येणार नाही परंतु सरकारच्या वतीनं उपलब्ध होणारी मदत ही वेळेत पीडित कुटुंबाला मिळेल, अशी तरतूद करावी. याशिवाय महावितरण विभाग व्यवस्थापन, अधिकारी, कर्मचारी आदींनी आपल्या कामातील गांभीर्यता ओळखून कामं करावीत. असला बेजबाबदारपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही.