
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
उत्तर प्रदेश मधील बहिदापूर या गावातील युवक सुनिल कुमार हा महाराष्ट्रातील इंदापूर तालुक्यातील, निमगाव केतकी येथे काम करण्यासाठी आला होता. आपला मुलगा कामासाठी महाराष्ट्रा त गेल्याने त्याचे कुटुंबीय खुप आनंदी होते त्याचबरोबर सुनील ही महाराष्ट्रात काम करून आपण आपला कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी हाताला मिळेल ते काम तो करत होता,पंरतू नियतीच्या मनात दुसरेच काही तर होते.
सुनिल हा आपल्या एका मित्राला घेऊन आंघोळ करण्यासाठी विहरीवरती गेला होता.सुनिल ला पोहता येत नसल्याने तो एका बकेट ने विहिरीतील पाणी घेऊन वरती आंघोळ करत होता, परंतु तो एक- दोन बकेट घेऊन झाल्यानंतर तो पुन्हा एकदा अजून एक बकेट घेण्यासाठी विहिरीमध्ये उतरत असताना त्याचा पाय घसरून तो विहिरीमध्ये पडला आणि क्षणार्धातच सुनील हा त्या विहिरीमध्ये बुडाला.आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही बातमी वाऱ्यासारखी निमगाव केतकी परिसरामध्ये कळली असता निमगाव केतकी येथील युवक आणि परिसरातील नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली तेथील विहिरी वरती गेल्यानंतर येथील परिस्थिती पाहिल्यानंतर भरपूर पाऊस पडल्यामुळे विहीर पूर्ण भरलेली होती आणि या विहिरीची खोली जास्त असल्याने विहिरीमध्ये उतरण्याचे कोणी धाडस करत नव्हते अशावेळी या विहिरीतील पाणी काढण्याशिवाय अन्य दुसरा कोणताही पर्याय नव्हता पाऊस आणि विहिरीतील पाण्याची पातळी पाहता हे पाणी काढण्यासाठी कमीत कमी दोन दिवस लागणार होते, तरीही गावातील माणिक (आबा) भोंग, गणेश घाडगे ,राजकुमार जठार, अमोल राऊत,सागर शिंदे तसेच निमगाव केतकीचे पोलीस स्टेशनचे शिंदे साहेब, भोसले साहेब, सर्कल भाऊसाहेब आणि पोलीस पाटील यांनी विहिरीतील पाणी काढण्याचा निर्णय घेतला.यासाठी विहिरीवर ती तीन विद्युत मोटर पंप लावण्यात आले होते, या कामासाठी प्रगतशील बागायतदार मधूकर यादव यांनी खुप मोलाचे सहकार्य केले, पंरतू विहिरीतील पाण्याची पातळी काही केले कमी होत नव्हती अन्य बरेच काही मार्ग अवलंबून झाले परंतु यश काही मिळाले नाही यामध्ये संपूर्ण एक दिवस चालला गेला.शेवटी तहसीलदार आणि गावातील सर्व नेते मंडळी, युवक वर्ग आणि प्रशासनाने गोताखोर पुणे येथील रेस्क्यू टीम यांना बोलावण्याचा निर्णय घेतला.
गोताखोर पुणे येथून रेस्क्यू टीम आल्यानंतर त्यांनी प्रशासनाच्या मदतीने सुनिल चा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यास यश आले.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.या परिसरामध्ये नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यामध्ये परराज्यातील काम करण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.या नंतर सुनिल चा मृतदेह इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला.
शवविच्छेदन झाल्यानंतर सुनिल च्या कुटुंबीयांशी माणिक (आबा) भोंग यांनी संपर्क साधून पुढील अन्य विधीसाठी विचारणा केली असता त्याच्या घरच्यांनी एकच हंबरडा फोडला यावेळी येथे उपस्थित असलेल्या माणिक (आबा) भोंग सह इतर सर्वांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले, सुनिल च्या घरच्यांनी त्याचा मृतदेह आपल्या गावी पाठविण्याची विनंती केली.पंरतू यासाठी खुप सारा खर्च येणार होता परंतु सुनिल च्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने ते हा खर्च करू शकत नव्हते.शेवटी माणिक (आबा) भोंग, गणेश घाडगे, राजकुमार जठार, अमोल राऊत,सागर शिंदे इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकवर्गणी करून सुनिल चा मृतदेह त्याच्या गावी पाठवला.गणेश घाडगे यांची अष्टविनायक रूग्णवाहिका यांनी सुनिल चा मृतदेह पुणे इथपर्यंत मोफत पोहोचवला . सुनिल हा अत्यंत शांत आणि मनमिळावू स्वभावाचा होता त्याच्या दूर्दैवी मृत्यू मुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या संपूर्ण काळात निमगाव केतकी येथील युवकांनी अथक परिश्रम घेतले.