
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
गाव गाव जोडला जावा म्हणून शासनाने करोडो रुपयांचा निधी खर्च करूनही अनेक पानंद रस्ते आहे त्या स्थितीत आहेत.एवढेच काय काही रस्ते कागदावरच असल्याने परिणामी शेतक-यांना याचा फटका बसतो.
देगलूर तालुक्यातील वझरगा परिसरातील पानंद रस्ते अजूनही चिखलमय असल्यामुळे सोयाबीन राशींना ब्रेक लागला आहे.
वझरगा , वन्नाळी गावातील पानंद रस्ता शेतात जाणारे पानंद रस्ता अजूनही चिखलमय असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उरलेले सोयाबीन कापणी केली. त्यामध्ये ढगफुटी झाली अनेकांचे मोठे नुकसानही झाले . रस्ते चिखलमय असल्यामुळे शेतामध्ये मळणी यंत्र येऊ शकत नसल्यामुळे ते सोयाबीन अजूनही शेतामध्ये आहे. शेतकऱ्यांना आर्थिक व मनुष्य बाळाचा आर्थिक खर्च बोजा पडला आहे. शेतामध्ये चिखलमय असल्यामुळे पायी जाणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे परिसरातील असे चित्र दिसत आहे. शासनाचा पानंद रस्त्याचा विविध योजनांचा उपक्रम अजूनही अनेक रस्ते वंचित आहेत त्यामुळे दरवर्षी अवकाळी पावसात काढणीच्या वेळी व राशीच्या वेळी तसेच शेतामध्ये अवजारे बी बियाणे खते घरापासून शेतापर्यंत जाण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या पानंद रस्त्याच्या योजनेच्या कासव गतीमुळे या अडचणी उद्भवत आहेत. त्यामुळे शेतकरी नैसर्गिक आपत्तीसह शासनाच्या विविध योजनेपासून ही वंचित आहे.