
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी करावी लागली.उदासीन नेते, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यामुळेच शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही.मतदानाच्या वेळेस घराच्या व गावाच्या भोवती फिरणारे मदत मिळाली की नाही याची चौकशी केली नाही.आणि आपण मात्र आलीशान बंगल्यात ऐषआरामात दिवाळी साजरी केली.पण गरीब शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची मदत मिळाली नाही.दुष्काळी अनुदान नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा करण्याचे काम सुरू असून ते असेच चार पाच महिने चालू राहील कारण ही बॅकेतील कर्मचारी व दलाल यांची खेळी आहे.पैसे जर लवकर दिले तर त्यांना काहीही मिळणार नाही म्हणून मध्यस्थी दलाल ठेवून जे गरीब अडाणी शेतकरी हजार पाचशे रुपये देतील त्यांनाच पैसे देण्याची प्रक्रिया चालू आहे.सरकारने घोषणा करून मोठी मदत दिली असल्याचे जाहीर केले पण शेतकऱ्यांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम जमा होत आहे.पिकविम्याचे अजून नाव सुध्दा नाही.अनेक संघटना उपोषणाला बसल्या आहेत पण सरकार त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला काहीही देणेघेणे नाही.त्यातल्या त्यात किसान सन्मान निधी योजनेतून गरीब शेतकऱ्यांना वगळून मोठ्या धनदांडग्यांची नावे ठेवली आहेत.तलाठ्याना विचारले असता ते म्हणत आहेत ही प्रक्रिया निरंतर चालणारी असून जे खरे लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळतील.किसान सन्मान निधी योजनेत नाव पुन्हा लावता येईल पण ते केंव्हा मिळणार हे सांगायला तयार नाहीत.तेंव्हा उठा शेतकऱ्यांनो सज्ज व्हा संघर्ष करा नेते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यामुळेच आपल्याला हक्काचे अनुदान,पिकविमा, किसान सन्मान निधी मानधन मिळाले नाही.आपल्याला दिवाळी अंधारात साजरी करावी लागली आहे.