
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
महाबळेश्वर तालुक्यांतील दरे या त्यांच्या मुळगावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांना देखील वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला. वेण्णालेक परिसरांतील वाहतूक कोंडीत तब्बल दीड तास त्यांना अडकून पाडावे लागले. लिंगमळा ते वेण्णालेक रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे महाबळेश्वर तालुक्यांतील दरे या त्यांच्या मूळगावी त्या शुक्रवारी काही कामानिमिंत्त निघाल्या होत्या. गावी जायला त्यांना सुमारे दीड तास उशीर झाला. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे या शुक्रवारी रात्री महाबळेश्वर तालुक्यांतील दरे आपल्या गावी जात होत्या. यावेळी लिंगमळा ते वेण्णालेक मुख्य रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मिसेस मुख्यमंत्री लता शिंदे यांना तब्बल दीड तासाहून अधिक काळ त्यांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले यात दिवाळी सुट्टीमुळे महाबळेश्वरांत पर्यटकांची संख्या चांगलीच वाढली होती. वेणालेक परिसरांत (केवळ दोनच पोलीस वाहतुकीचे नियंत्रण करत होते )त्यामुळे लता शिंदे यांना वाहतूक कोंडीत अडकून पाडावे लागले. सुमारे दीड तासानंतर त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली.