
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार:-भारत जोडो यात्रा नांदेड जिल्हयात दि.7 नोव्हेंबर रोजी देगलुर येथे आगमन होणार असल्याने त्या संदर्भात नियोजन बैठक कौठा येथे काँग्रेसच्या वतिने आयोजन काँग्रेस तालुकाध्यक्ष बालाजी पाडागंळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.भारत जोडो यात्रा संदर्भात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मोठ्या प्रमाणात बैठकावर भर देण्यात येत आहे कौठा सर्कल मधील कौठा बारुळ काटकळंबा शिरुर तेलूर कौठावाडी धानोरा आदि गावातील कार्यक्रत्ते सहभागी होणार असून यासाठी कौठा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजी पाडागंळे यांनी भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशे आवाहन करण्यात आले यावेळी तालुका उपाध्यक्ष नागोराव मोरे अभिजीत हाळदेकर कमलाकर शिंदे, गुरुनाथ पाटील नंदनवनकर,नारायण सावकार कुभरगावे,बळवंत काकडे आदि उपस्थित होते बैठकीचे आयोजन युवक काँग्रेसचे भुजंग देशमुख, शंकर स्वामी, बाळू इदोरे, माधव मुडकर,संभाजी पवळे,बालाजी पालिमकर,युसुफ पठाण, धम्मदिप वाघमारे,मारोती सुभाष पाटील जाधव पाटील आदीने बैठकीचे आयोजन केले होते .